24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूर२१ जणांचे रक्तजल नमुने डेंग्यू पॉझिटिव्ह

२१ जणांचे रक्तजल नमुने डेंग्यू पॉझिटिव्ह

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातून २०५ डेंग्­यु संशयीत रुग्­णांचे रक्­तजल नमुने सेंन्­टीनल लॅब, नांदेड येथे तपासणीसाठी पाठविले असता अद्यापपर्यंत एकुण २१ रुग्­णांची रक्­तजल नमुने डेंग्­यु आजाराकरीता पॉझिटीव्­ह आले आहेत. त्­यामुळे शहरातील डेंग्­यु संशयीत रुग्­णाची वाढती संख्­या लक्षात घेवून शहरामध्­ये डेंग्­यु प्रतिबंधात्­मक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्­यासाठी दि. १८  ते २८ जनू  या कालावधीमध्ये संपूर्ण शहरात अबेट मोहीमेचा दुसरा राउंड राबविण्यात येत आहे.
मनपा आयुक्त्त  बाबासाहेब मनोहरे,  उपायुक्त  डॉ. पंजाब खानसोळे यांच्या मार्गदर्शनानुसार डेंग्यु ताप प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या अनुषंगाने लातूर शहर महानगरपालिकेमार्फत माहे मे-२०२४ अखेर  ऍबेट मोहिमेचा पहिला राऊंड शहरामध्­ये राबविण्­यात आला होता. सदर मोहिमेमध्­ये शहरातील एकुण ८१,८०६ घरांना आरोग्­य कर्मचा-यांमार्फत भेटी देवून करण्­यात आलेल्­या किटश शास्­त्रीय सर्वेक्षणात ४,२१६ घरांमध्­ये डास आळी दुषित पाणीसाठे आढळून आले, दुषित पाणीसाठे नष्­ट करण्­यात आले आणि  उर्वरित  पाणीसाठ्यामध्­ये अ‍ॅबेट औषध टाकून संबंधीतांना डेंग्­यु प्रतिबंधात्­मक उपाययोजनाविषयी आरोग्­य शिक्षण देण्­यात आले.
आठवड्यातून एकदा हे नक्की करा. घराभोवती ज्या मध्ये पावसाचे पाणी साचू शकेल अशा निरुपयोगी वस्तू ठेवू नये, त्या नष्ट कराव्यात. कुलदाणी, कुंडी मनीप्लान्ट इत्यादीतील पाणी नियमित बदलावे. परिसरातील डबकी वाहती करावी. नाले स्वच्छ करावेत. ड्रम किंवा इतर पाण्याची भांडी पुर्णपणे रिकामी करावीत. स्वच्छ धुतल्या नंतर भरून झाकण लावावे. तरी या मोहिमेत एकूण ८ नागरी आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांचे मार्फत राबविण्यात येत आहे. तरी अ‍ॅबेट मोहिमेत घर भेटीस येणा-या आरोग्या कर्मचा-यास सहकार्य करावे असे आवाहन मनपा आरोग्याधिकारी डॉ. शंकर भारती यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR