लातूर : प्रतिनिधी
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती व शिवछत्रपती मार्केट यार्ड लातूर येथील सर्व घटकांच्या वतीने संत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री क्षेत्र चाकरवाडी येथे होत असलेल्या सप्ताहास महाप्रसादासाठी दि. १८ जुन रोजी अन्नधान्य पाठविण्यात आले.
मागील २४ वर्षापासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती व शिवछत्रपती मार्केट यार्ड येथील सर्व घटकांच्या वतीने श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त डाळ, तेल, साखर इत्यादी प्रकारचे अन्नधान्य पाठविण्यात येते. हि परंपरा कायम ठेवत यावर्षी देखील रुपये ७ लाख ५० हजार पेक्षा जास्त किमतीच्या धान्याच्या दोन ट्रक श्री क्षेत्र चाकरवाडी येथे पाठवण्यात आल्या. अन्न धान्याने भरलेल्या मालाचे पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे यांचे हस्ते करण्यात आले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झेंडा दाखवून मालाचे ट्रक श्री क्षेत्र चाकरवाडी ला पाठविण्यात आले.
यावेळी माजी आमदार वैजनाथराव शिंदे, माजी सभापती लालीतभाई शहा, सचिव भगवानराव दुधाटे, अशोक (गट्टूशेठ) अग्रवाल, हुकूमचंद कलंत्री, बाळासाहेब बिदादा, रामविलास लोहिया, तुळशीराम गंभिरे, चंद्रकांत पाटील, सुरेश धानुरे, सुरेश मालू, आनंद मालू, आशिष अग्रवाल, अमर पवार, बश्वराज चवळे,शिवाजी कांबळे, हर्षवर्धन सवई, सुनील राठी, भास्कर शिंदे, रमेश सूर्यवंशी यांची उपस्थिती होती.