28.4 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeराष्ट्रीयदिल्लीत २४ तासांत उष्माघाताने १७ जणांचा मृत्यू

दिल्लीत २४ तासांत उष्माघाताने १७ जणांचा मृत्यू

भीषण उष्णतेमुळे बळींच्या संख्येत वाढ

नवी दिल्ली : येथील राम मनोहर लोहिया (आरएमएल), लोकनायक जयप्रकाश (एलएनजेपी) आणि सफदरजंग या तीन रुग्णालयांत गेल्या २४ तासांत उष्माघातामुळे एकूण २२ जणांचा मृत्यू झाला, असे अधिका-यांनी सांगितले. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून उष्णतेची तीव्र लाट आहे; मात्र गुरुवारी सकाळी झालेल्या हलक्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.

सफदरजंग रुग्णालयातील अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, उष्णतेमुळे त्रस्त ३३ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी १३ जणांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. ‘एलएनजेपी’ या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या १७ पैकी पाच रुग्णांचा गेल्या २४ तासांत मृत्यू झाला. तर, ‘आरएमएल’ रुग्णालयात गेल्या २४ तासांत उष्माघाताचे २२ रुग्ण आले; त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

‘शहरातील मुख्य स्मशानभूमी असलेल्या निगमबोध घाट येथे बुधवारी १४२ मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. ही संख्या सरासरीपेक्षा १३६ टक्के जास्त आहे. येथे दररोज सुमारे ५०-६० मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आणले जातात. मंगळवारी येथे ९७ मृतदेह आणण्यात आले होते असे स्मशानभूमीतील कामकाजाचे व्यवस्थापन करणा-या ‘निगमबोध घाट संचलन समिती’च्या सरचिटणीस सुमन गुप्ता यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR