24.9 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरशिरापूर उपसा सिंचन योजनासाठी प्रयत्न: आ.यशवंत माने

शिरापूर उपसा सिंचन योजनासाठी प्रयत्न: आ.यशवंत माने

उत्तर सोलापूर / तालुका प्रतिनिधी
नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नातून अर्थसंकल्पीय बजेट मधून मंजूर केलेल्या कामाचे व आमदार फंडातून नान्नज ते नरोटेवाडी यारस्त्याकरिता ५ कोटी, नान्नज ते बीबीदारफळ रस्त्या करिता ७ कोटी तर नरसिंह समाज मंदिराकरिता ५ लाख असे एकूण १२ कोटी ५ लाख रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन शनिवारी मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे होते. यावेळी सरपंच राणी टोणपे, प्रशासकीय सल्लागार दत्तात्रय विभुते, कृषिभूषण दत्तात्रय काळे, संभाजी दडे, प्रकाश चोरेकर, सुनील भोसले, प्रल्हाद काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आ. माने म्हणाले, नान्नज-मार्डी रस्त्यावरील अभयारण्य क्षेत्रातील रस्त्याच्या कामाला परवानगी येणार असून मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून नान्नज मोहितेवाडी रस्त्याकरिता सात कोटी रुपये मंजूर करण्यातयेणार आहेत. मार्च महिन्यापर्यंत उत्तर सोलापूर तालुक्याची वरदायिनी असलेल्या शिरापूर उपसा सिंचन योजनाही अस्तरीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मंजूर करण्यात आलेली कामे अद्यापही ठेकेदाराकडून केली नाहीत. दोषी ठेकेदारांवर कारवाई करणार येणार असल्याचे सांगितले. २५१५ मधून ही मोठ्या प्रमाणात निधी आणणार असल्याचे सांगत मोहोळ मतदार संघातील विकासाकरिता कटिबद्ध असल्याचे यावेळी ते म्हणाले. साठे यावेळी बोलताना म्हणाले, आमदार माने यांनी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी वाटप केला आहे. विविध विकास कामांसाठी ते निधी खेचून आणत असून याबद्दल त्यांचे कौतुक आहे.

यावेळी दीपक अंधारे, प्रविण भालशंकर, दिलीप माने, श्रीकांत मुळे, नागेश पवार, केदार विभुते, मंजूर शेख, उमेश भगत, हनुमंत टोणपे, जगन्नाथ भोरे, संजय मुळे, शिरीष म्हमाणे, प्रमोद कोरे, निलेश गवळी, हरीभाऊ घाडगे, हनुमंत गायकवाड, केदार उंबरे, दाजी गोफणे, सिध्देश्वर काळेसह नान्नज, नरोटेवाडी, बीबीदारफळचे शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR