23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeलातूरअ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणुक करु नये

अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नेमणुक करु नये

लातूर : प्रतिनिधी
लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झालेले अ‍ॅड. उज्ज्वल निकम हे आता एका पक्षाची राजकीय पार्श्वभूमी असलेले व्यक्तीमत्व आहेत. ते आता सरकारी वकील म्हणून निष्पक्षपणे काम करतील, याची शक्यता खुप कमी असल्यामुळे त्यांची सरकारी वकील म्हणून नेमणुक करण्यात येऊ नये, या मागणीचे निवेदन लातूर शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)च्या वतीने मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविण्यात आले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकसभा निवडणूक लढविलेले विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम यांच्या पराभव झाला व त्यानंतर त्यांची परत आणखी एकदा विशेष सरकारी वकील म्हणुन आणखी निवड करण्यात आली. यामध्ये आरोपी किंवा फिर्यादी हा भाजपाशी निगडित असेल तर त्यामध्ये अ‍ॅड. उज्वल निकम हे निष्पक्षपातिपणे काम करु शकणार नाही, असे वाटते. म्हणुन अ‍ॅड. उज्ज्वल निकम याना विशेष सरकारी वकील म्हणुन सरकारने नेमू नये असे निवेदन लातूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले.
यावेळी  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, अ‍ॅड. शेखर हवेले, अ‍ॅड. राजकुमार गंडले, अ‍ॅड. इरफान शेख, अ‍ॅड. यु. जे. नाईकनवरे, अ‍ॅड. विनायक शिंदे,ह्या्रवीण साळुंखे, विशाल देवकते, आदर्श उपाध्य कल्पना फरकांडे, महादेव गव्हाणे, विशाल विलास माने, आश्रेश्वर शितोळे, तुषार मुचवाड, पृथ्वी कापसे, राहुल ढाले, तोफिक शेख, सहदेव खराटमोल, इमु पठाण व  डी उमाकांत यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR