23.4 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeराष्ट्रीयलोकसभा सदस्य म्हणून निलेश लंकेंची संसदेत इंग्रजीतून शपथ

लोकसभा सदस्य म्हणून निलेश लंकेंची संसदेत इंग्रजीतून शपथ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या सुजय विखे पाटलांचा पराभव करून निलेश लंके विजयी झाले. आज लंके यांनी लोकसभेचा सदस्य म्हणून संसदेत इंग्रजी भाषेतून शपथ घेतली. निलेश लंकेंनी इंग्रजी भाषेत घेतलेली शपथ सध्या चर्चेचा मुद्दा बनली आहे.
अहमदनगर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारात निलेश लंके यांच्या शिक्षणावरून त्यांना विरोधकांनी हिणवले होते. त्यात सुजय विखे पाटील यांनी भाषणात निलेश लंके इंग्रजीतून कसे बोलणार, त्यांना इंग्रजी येते का असा सवाल उपस्थित करत त्यांची खिल्ली उडवली होती.

मात्र निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांचा पराभव करत दिल्ली गाठली. दिल्लीच्या संसदेत जाताना खासदार निलेश लंके यांनी पाय-यांवर डोके टेकले. त्यानंतर सभागृहात खासदारांचा शपथविधी होत असताना निलेश लंके यांचे नाव पुकारले. तेव्हा निलेश लंके यांनी चक्क इंग्रजीतून शपथेला सुरुवात केली त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर लंके यांनी शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र आणि रामकृष्ण हरी म्हणत हात जोडले.
निवडणुकीच्या प्रचारात सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांना इंग्रजी भाषेवरून टोला हाणला होता. लोकसभेच्या निवडणुकीतून निवडून आलेला खासदार दिल्लीत जातो.

त्यामुळे, या खासदार महोदयांना हिंदी, इंग्रजी भाषांचे ज्ञान असणे आवश्यक आहे अशी बोचरी टीका विखेंनी निलेश लंकेंवर केली. त्याचसोबत निलेश लंकेंनी माझ्याएवढे इंग्रजी बोलून दाखवावे, भलेही एक महिनाभर घोकमपट्टी करावी, पाठ करून बोलून दाखवावे, पण इंग्रजीत बोलावे. त्यांनी इंग्रजीत बोलून दाखवल्यास मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतो, असे चॅलेंजच सुजय विखेंनी लंकेंना दिले होते. त्या टीकेला निलेश लंकेंकडूनही जशास तसे उत्तर देण्यात आले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR