22.3 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या गाजर आंदोलनाने वेधले लक्ष

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या गाजर आंदोलनाने वेधले लक्ष

सोलापूर : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात शासनाने वेळोवेळी फक्त आश्वासनाचे गाजर दाखविले. कोणत्याच मागण्या मान्य केल्या नाहीत. येत्या अधिवेशनात सरकारनं अंगणवाडी सेविका, मदतनीस व कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ, ग्रॅच्युइटी, पेन्शन व अन्य मागण्यांबाबत विचार न केल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत अंगणवाडी कर्मचारी महायुतीच्या विरोधात प्रचार करून सरकारला गाजर दाखविणार असल्याचा इशारा सोलापुरात दिला.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात सोलापूर जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविका, मदतनीस व कर्मचारी यांनी गाजर आंदोलन केले चार हुतात्मा
चौकातून आंदोलनाला सुरुवात झाली. हुतात्मा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिध्देश्वर मंदिर सिध्देश्वर प्रशालामार्गे जिल्हा परिषदेच्या पुनम गेटसमोर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले.

या आंदोलनाब महिलांनी सरकारच्या विरोधान घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र उपमुख्यमंत्री व अन्य मंत्र्यांच्या विरोधात घोषाणा दिल्या . अंगणवाडी कर्मचाऱ्यांनाशासकीय सेवेचा दर्जा द्या ,अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरघोस वाढ करा, ग्रॅच्युइटी, पेन्शन त्वरित लागू करा, रजिस्टरसाठी पैशांची तरतूद करा,उन्हाळी सुटी एक महिना द्या,ईंधन बिलाचे पैसे वाढवून द्या,मोबाइल रिचार्जचे पैसे वाढवून द्या, संप काळातील मानधन त्वरित द्या आदी मागण्या अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या आहेत.या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी लाल साड्या परिधान केल्या होत्या.

अत्यंत शिस्तबध्द असा हा मोर्चा सोलापुरात निघाला होता. मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर सरकारच्या विरोधात महिलांनी आक्रोश व्यक्त करीत मागण्यांबाबत सरकारला विचारणा केली. मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषद प्रशासनाला देण्यात आले. यावेळी राज्य कार्याध्यक्ष सूर्यमण गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सरला चाबूकस्वार, जिल्हा उपाध्यक्ष कांचन पांढरे आदी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR