23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरसोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून होणार भोगाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी

सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून होणार भोगाव परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी

सोलापूर :शहर, जिल्ह्यातून संकलित केलेले मेडिकल वेस्ट वर्गीकरण न करता भोगावच्या प्रकल्पामध्ये जाळले. त्यामुळे परिसरात काळ्या धुराचे कण पसरले. त्या धुरात कार्बन डायऑक्साईड असल्यामुळे भोगाव भागातील नागरिकांना टी. बी. सह श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पामुळे जवळपास दोन हजार लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून परिसरातील दोन हजार नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली. भोगाव येथील बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाची अचानक तपासणी केली. त्यावेळी तेथे प्रक्रिया न केलेले २०० टन बायोमेडिकल वेस्ट साठवून ठेवल्याचे उघडकीस आले. वास्तविक योग्य वर्गीकरणानंतर संकलित केलेले बायोमेडीकल वेस्ट वेगवेगळ्या पद्धतीने जाळणे अपेक्षित आहे. मात्र वेगळे वर्गीकरण न करता काही प्रमाणात बायोमेडीकल वेस्ट जाळल्यामुळे काळा धूर निर्माण झाला.

त्याचे कण परिसरात मोठ्या प्रमाणात पसरले. या धुरांमध्ये कार्बनडाय ऑक्साइड असल्यामुळे भोगाव व परिसरातील नागरिकांना टी. बी., श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची आरोग्याची तपासणी करण्याचा निर्णय आरोग्य विभागाचे घेतला आहे.

पूर्वी भोगाव परिसरात फारशी लोकवस्ती नव्हती. त्यामुळे हा प्रकल्प तिथे साकारण्यात आला. मात्र, आता त्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे. तब्बल दोन हजारपेक्षा अधिक लोकवस्ती या ठिकाणी आहे. त्या सर्वांचे आरोग्य या अर्धवट स्थितीत असल्याने या दोन हजार लोकांचे आरोग्य या बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पामुळे धोक्यात येऊ शकते.

या बायोमेडिकल वेस्ट प्रकल्पाची चिमणी कालबा झाली आहे. चिमणीचा वरील सर्व भाग जळून खाक झाला आहे. सध्याची चिमणी अर्धवट स्थितीत आहे. तरीही या चिमणीचा वापर केला जात असल्याने त्यातून बाहेर पडणाऱ्या काळ्या धुराच्या कणाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेच भोगाव परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR