22 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्रातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ

महाराष्ट्रातील ४८ पैकी ३६ खासदारांची मराठीतून शपथ

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : लोकसभेच्या विशेष अधिवेशनात सभागृहाचा सदस्य म्हणून नवनिर्वाचित खासदारांना शपथ देण्यात आली. मागील २ दिवसांत महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी संसदेत शपथ घेतली. यातील बहुसंख्य ३६ खासदारांनी मातृभाषा मराठीत शपथ घेतली तर काही खासदारांनी इंग्रजीतून ३ आणि हिंदीतून ९ जणांनी शपथ घेतली.

कॉँग्रेस : शोभा बच्छाव, बळवंत वानखेडे, प्रतिभा धानोरकर,कल्याण काळे, वसंत चव्हाण, वर्षा गायकवाड, शिवाजी काळगे, छत्रपती शाहू महाराज, प्रणिती श्ािंदे, गोवाल पाडवी (सर्व मराठी). शामकुमार बर्वे यांनी हिंदीतून तर प्रशांत पडोले, किरसान नामदेव यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

भाजप : छत्रपती उदयनराजे भोसले, मुरलीधर मोहोळ,
रक्षा खडसे, स्मिता वाघ, नारायण राणे, अनुप धोत्रे ( सर्व मराठी). पीयूष गोयल, नितीन गडकरी यांनी हिंदीतून तर हेमंत सावरा यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

शिवसेना (ठाकरे गट) : संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, संजय जाधव, राजाभाऊ वाजे, संजय दिना पाटील, अनिल देसाई, अरविंद सावंत, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर (सर्व मराठी)

राष्ट्रवादी (शरद पवार) : अमर काळे, भास्कर भगरे,
सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), बजरंग सोनावणे, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील (सर्व मराठी) मात्र निलेश लंके यांनी इंग्रजीतून शपथ घेतली.

शिवसेना (शिंदे गट) : प्रतापराव जाधव, संदीपान भुमरे, श्रीकांत श्ािंदे, नरेश म्हस्के, रवींद्र वायकर, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने (सर्व मराठी).

राष्ट्रवादी (अजित पवार) : सुनील तटकरे यांनी मराठीतून आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी हिंदीतून शपथ घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR