24.3 C
Latur
Monday, January 27, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअंतराळातून बॅटरीचा तुकडा घरावर पडला, ‘नासा’वर भरपाईचा दावा

अंतराळातून बॅटरीचा तुकडा घरावर पडला, ‘नासा’वर भरपाईचा दावा

नेपल्स (वृत्तसंस्था) : अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतातील एका कुटुंबाने अमेरिकेची जगप्रसिद्ध अंतराळ संस्था ‘नासा’वर तब्बल ८०,००० डॉलरचा (सुमारे ६६ लाख ८५ हजार रुपये) नुकसान भरपाईचा मजबूत दावा ठोकला आहे.

८ मार्च २०२१ रोजी अंतराळातून ७०० ग्रॅम वजनाचा एक तुकडा या अमेरिकन कुटुंबाच्या छतावर कोसळला आणि त्यामुळे त्यांच्या छताला छिद्र पडले होते. या घटनेनंतर नासाच्या संशोधकांनी या तुकड्याची तपासणी केली असता ती अंतराळात प्रयोगशाळेच्या वापरलेल्या बॅटरीचा तुकडा होता. साल २०२१ मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने हा अंतराळात कचरा म्हणून सोडला होता.

अमेरिकन स्पेस एजन्सीच्या अधिका-यांनी सांगितले की, खरे तर असे तुकडे अंतराळात फिरत असतात. ते फिरत फिरत कधी पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत शिरले तर जळून आकाशातच नष्ट होतात. परंतू हा बॅटरीचा पार्ट नष्ट झाला नसल्याने नेमका घरावर कोसळला असवा असे स्पष्ट केले.

क्रॅनफिल समनेर ही कायदा फर्म या कुटुंबाची केस लढवित आहे. वकीली मदत पुरविणा-या या संस्थेच्या मते त्यांच्या अशिलाचे फ्लोरिडाच्या नेपल्स येथे एलेजांद्रो ओटेरो यांचे घर आहे. बॅटरीचे नकोसे पार्ट आकाशातून थेट घरावर कोसळ्याने त्यांना काही बरेवाईट झाले असते तर घटनेत सुदैवाने त्यांच्या छताला छीद्र पडले आहे. परंतू जीव जाण्याचा देखील धोका होता, म्हणून ही नुकसान भरपाई मागण्यात आल्याने त्यांनी म्हटले आहे.

जेव्हा अंतराळातून ही अवजड वस्तू घरावर कोसळली तेव्हा त्यांचे अशिल ओटेरा यांचा मुलगा डॅनियल घरी एकटा होता. या घटनेत सुदैवाने त्याला काही झाले नाही. परंतू नासाच्या हलगर्जीने एखाद्या व्यक्तीचा जीव देखील जाऊ शकतो असे वकीली फर्मने म्हटले आहे. आपल्या क्लायंटच्या जीवनावर या घटनेने आघात झाला आहे. त्याची नुकसान भरपाई त्यांना मिळायलाच हवी असे वकील मीका गुयेन वर्थी यांनी सांगितले. अंतराळातील कच-यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. भविष्यात यामुळे अपघात देखील होऊ शकतात. नासाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रीया याबाबत दिली नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR