34.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeलातूरईरन्ना कोनगलवारकडे एक दुचाकी व कार

ईरन्ना कोनगलवारकडे एक दुचाकी व कार

लातूर : विनोद उगीले
नीट परीक्षेतील गुणवाढीच्या घोटाळ्याचे लातूरातील धागेदोरे असलयाचे उघड झाल्यानंतर लातूरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात चार जणा विरोधात नवीन कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यातील लातूरात वास्तव्यास असलेल्या व फसवेगिरीतून कोट्यावधी रूपयांची माया मालमत्ता जमवणा-या व याकामी आलीशान गाड्या मिरवणा-या तीन पैकी दोघांच्या नावावर साधी दुचाकी ही नाही तर एकाकडे दुचाकी व स्वीफट कार असल्याचे समोर येत आहे.
लातूरात शनिवारी दाखल झालेल्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिटने लातूरातील संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण या दोन शिक्षकांना ताब्यात घेऊन त्यांची या प्रकरणी चौकशी करून सोडून दिले होते. मात्र रविवारी रात्री उशिरा याच लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) नांदेड युनिट यांचेकडून पेपरफु टीच्या नवीन कायद्यानुसार या दोन शिक्षकासह धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक ईरन्ना मष्णाजी कोनगलवार मुळ रा. देगलूर, जि. नांदेड व दिल्ली येथील गंगाधर नामक व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या गुन्ह्यातील  चार संशयीत आरोपी पैकी जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण यांना पोलीसांनी गजाआड केले असून ते सध्या पोलीस कोठडीची हवा खात आहेत. तर या गुन्ह्यात मुख्य सुत्रधार असलेला सध्या लातूर शहरात वासत्व्यास असलेला व मुळ रा. देगलूर, जि. नांदेडचा  धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक असलेला  ईरन्ना मष्णाजी कोनगलवार हा आपल्या कुटूंबासह फरार आहे. तर दिल्लीच्या गंगाधर नामक आरोपीचा अद्यापही पोलीसांना थांगपत्ता लागलेला नाही.
या बहुचर्चित गन्ह्यातील आरोपींनी फसवेगिरीतून कोट्यावधी रूपयांची माया घर मालमत्ता जमवल्याचे व याकामी आलीशान गाड्या मिरवल्याचे पुढे येत आहे. असे असले तरी या आरोपीतांपैकी जिल्हा परिषदेचे शिक्षक असलेल्या संजय तुकाराम जाधव व जलीलखाँ उमरखान पठाण यांच्याकडे, यांच्या नावावर स्वत:हाच्या मालकी ताब्येतील चारचाकी सोडा साधी दुचाकी ही नाही तर फरार असलेल्या व धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील आयटीआय शिक्षक असलेल्या ईरन्ना मष्णाजी कोनगलवार याचे कडे मात्र स्वीफट डिझायर कार एमएच २४ एएस १२११ व दुचाकी एमएच २४ एई ९९०६ ही आहे.
हि स्वीफट डिझायर कार व दुचाकी आज रोजी जरी फरार असलेल्या ईरन्ना मष्णाजी कोनगलवार याच्या नावे असली तरी त्याच्या लातूरातील अलिशान सध्या कुलूपबंद असलेल्या घरासमोर एमएच २४ एएल ७०४० व एमएच २४ वाय ०३०८ क्रमांकाची दोन स्कूटी थांबून आहेत. कदाचीत त्या त्याच्याच मालकीच्या पण त्या कुटूंबातील सदस्यांच्या नावे असाव्यात.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR