मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून कोणाला संधी दिली जाणार? याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विधानपरिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.
केंद्राकडे पाठवण्यात आलेल्या १० जणांच्या यादीत समाविष्ट असलेली नावे पुढीलप्रमाणे… पंकजा मुंडे, अमित गोरखे, परिणय फुके, सुधाकर कोहळे, योगेश टिळेकर, निलय नाईक, हर्षवर्धन पाटील, रावसाहेब दानवे, चित्रा वाघ, माधवी नाईक.
विधानपरिषदेचं गणित : जुलैमध्ये राज्यात ११ जागांसाठी विधानपरिषदेची निवडणूक पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जुळवाजुळव सुरू केली. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधान परिषद निवडणुकीवरुन जोरदार खलबतं सुरू झाली आहेत. ११ जागांपैकी तीन जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा ठाम विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. याबाबत आपले गणित पक्कं असल्याचे सांगून त्यांनी महायुतीचे आमदार फुटणार असल्याचे सूचक वक्तव्यही केले आहे.
कुणाकडे किती संख्याबळ …
महायुती
भाजप : १०३
श्ािंदे सेना : ३७
राष्ट्रवादी (अजित पवार) : ३९
छोटे पक्ष : ९
अपक्ष : १३
एकूण : २०१
महाविकास आघाडी
काँग्रेस : ३७
ठाकरे गट : १५
राष्ट्रवादी (शरद पवार) : १३
शेकाप : १
अपक्ष : १
एकूण : ६७
एमआयएम : २
सपा : २
माकप : १
क्रां. शे. प. : १
तटस्थ : ६
विधानसभेतील संख्याबळ : २७१