मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी आता राज्य सरकारने पावले टाकायला सुरुवात केली आहे. त्यानुसार, विद्यापीठ स्तरांवर हालचाली सुरु झाल्या असून यासंदर्भात संशोधनासाठी विशिष्ट केंद्रं निर्माण केली जाणार आहेत. यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये करण्यात आली आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली.
अजित पवार म्हणाले शाश्वत ऊर्जा, आरोग्य तसेच कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबात अर्थात एआय संशोधनासाठी राज्यातील विद्यापीठ आणि संशोधक यांच्या संयुक्त विद्यमानाने संशोधन नवे उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यासाठी नवउपक्रम केंद्रे स्थापित करण्यात आली आहेत. त्यासाठी विद्यापीठ आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० कोटी रुपये असा एकूण १०० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या या घोषणेनंतर आता राज्यातील विद्यापीठांमध्ये एआयवर आधारित अभ्यासक्रमही तयार केले जाऊ शकतात. त्याचबरोबर येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रत्यक्ष त्याच्या अंमलबजावणीलाही सुरुवात होण्याची शक्यता आहे.