मुंबई : राज्यात अनेक घडामोडी घडत असतानाच आता राजकीय वर्तुळातून एक बातमी समोर आली आहे. विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी येत्या ११ जागांसाठी येत्या १२ जुलैला निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवार २ जुलै हा शेवटचा दिवस आहे. अशात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीला आमदार फुटण्याची भीती आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषद निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे.
राजकीय वर्तुळात विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महायुतीकडे ९, तर मविआकडे २ उमेदवारांपुरती मते आहेत. तर दुसरीकडे भाजपकडे ५ आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी २ उमेदवारांची मते आहेत. तर महाविकास आघाडीत काँग्रेसकडे एका उमेदवाराची मत आहे, तर मविआकडे एकूण २ उमेदवारांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिल्यास भाजप सहावा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचीही माहिती आहे.
त्याचबरोबर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा देखील दावा केला जात आहे. महायुतीची ६ मते फुटल्यास महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार जिंकण्याची शक्यता आहे. या निवडणुकीत आमदार फुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विधानसभेतील संख्याबळानुसार यापैकी ९ जागांवर महायुतीचे आणि दोन जागांवरती महाविकास आघाडीचे २ उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. फक्त ११ व्या जागेसाठी जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र आहे. या ११ व्या जागेसाठी शेकापचे नेते जयंत पाटील देखील उत्सुक आहेत. जयंत पाटील यांचे सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा विधानपरिषदेवर निवडून जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे.