21.7 C
Latur
Friday, November 29, 2024
Homeलातूरजया हयुंडाई येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात

जया हयुंडाई येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात

लातूर : जया हयुंडाई लातूर शोरुम येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम शनिवार दि. २९ जून रोजी पार पडला.
कोरोना काळातील ऑक्सिजनचे महत्त्व हाच यामागील प्रमुख उद्देश आहे. कोरोना महामारीच्या काळात आपल्याला ऑक्सिजनचे महत्त्व किती आहे ते ख-या अर्थाने समजले आहे. प्रकृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. केवळ झाडे लावून संवर्धन होत नाही तर ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा मूलमंत्र जपला पाहिजे, आणि रोड सेफ्टी मार्गदर्शन पण केले.आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून प्राणवायू आपल्याला फुकट मिळतो आणि आपण झाडांची कत्तल करत सुटलो आहोत, हे कुठेतरी थांबले पाहिजे.

वृक्षतोड करू नका. निसर्गाच्या विरुद्ध कुणीही जाऊ नये. प्रत्येकाने निसर्गाचे रक्षण केले पाहिजे. वृक्ष लावून त्याचे जतन करावे. झाडे आहेत म्हणूनच आपण आहोत, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. हवेतील ऑक्सिजन वाढणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशाने जया हयुंडाई लातूर शोरुममध्ये वृक्षरोपण करण्यात आले. तरी प्रत्येकाने किमान एकतरी झाड लावावे. लातूर येथील परिवहन विभागाचे इन्स्पेक्टर मंगेश गवारे यांनी व्यक्त केले. त्या बरोबरच जया हयुंडाईचे जनरल मॅनेजर संतोष अडगळ, सेल्स मॅनेजर राहुल झुंजे, सर्व्हिस मॅनेजर अभिजित जाधव, कॅशियर शंकर होळकर, ईडीपी मॅनेजर अमर वडवळे आणि जया हयुंडाईचा पूर्ण सेल्स व सर्व्हिस स्टाफ या सर्वांच्या उपस्थितीत झाडे लावा, झाडे जगवा कार्यक्रम राबविण्यात आला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR