मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने टी २० विश्वचषक जिंकला. देशातील क्रिकेटप्रेमी विश्वचषक स्पर्धेतील विजयाचा आनंद साजरा करत असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी त्यांना धक्का दिला. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी वर्ल्ड कपमधील विजयानंतर टी २० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
यामुळे या खेळाडूंच्या चाहत्यांना एकच धक्का बसला. आता रोहित शर्मा याने अचानक निवृत्ती का घेतली? त्याबाबत त्यानेच स्वत: स्पष्टीकरण दिले आहे. रोहित शर्मा याने म्हटले आहे की, मी निवृत्त होण्याचा विचार केला नव्हता. परंतु परिस्थिती अशी आली की मला निवृत्त होण्याची हिच योग्य वेळ आहे. आता रोहित शर्मा याचा हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्मा याचा निवृत्तीचा व्हीडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. रोहित शर्मा याचे फॅन आता गौतम गंभीरचा संदर्भ जोडत आहे. गौतम गंभीर टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या स्पर्धेत आघाडीवर आहे. त्यामुळे रोहित शर्मा याचा फॅन असलेल्या एका युजरने म्हटले आहे की, रोहित शर्माला गंभीर टारगेट करत होते. त्यामुळे रोहित शर्मा याने स्वत:च निवृत्तीचा विचार केला. परंतु अनेक युजर हा दावा फेटाळला आहे.
गंभीरचा ‘त्या’ निर्णयाशी संबंध नाही
एका युजरने लिहिले आहे, ‘‘नॉनसेन्स!’’ गंभीरचा त्या निर्णयाशी काहीही संबंध नाही. रोहित शर्मा याने त्याचा जुना सहकारी विराट निवृत्त झाल्याचे पाहिले आणि त्याला वाटले की चॅम्पियन म्हणून बाहेर पडण्याची हीच योग्य वेळ आहे. टी २० मध्ये अजून काही साध्य करायचे नाही, कारण नुकताच विश्वचषक जिंकला आहे. टीम इंडिया एका नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे, जो राहुल द्रविडची जागा घेईल. यासाठी गौतम गंभीरने एक मुलाखतही दिली आहे.