कुर्डुवाडी : नीट परीक्षा घोटाळ्यात लातूर पोलिसांकडून अटक करण्यात आलेला टाकळी (टें) (ता. माढा) येथील जिल्हा त परिषद प्राथमिक शाळेचा आरोपी निलंबित उपशिक्षक संजय तुकाराम जाधव हा कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी पंचायत समिती अंतर्गत त नोकरीस होता, तेंव्हा देखील लातूर येथील अंबाजोगाई रोडवर तो सीईटी सेंटर चालवित होता, त्याचबरोबर त्याच सेंटरमधून विविध स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरण्याचेही काम केले जायचे. त्यातही त्याने हेराफेरी करून सन २०१६ साली घोटाळा केल्याचा आरोप होता. ते उघड झाल्याने त्याच्या त्या सेंटरची मान्यताच संबधित यंत्रणेकडून काढून घेऊन रद्द करण्यात आली होती.
त्यावेळेसही त्याचा मित्र व नीट घोटाळ्यातील दुसरा आरोपी जलीलखां पठाण हा सहभागी असल्याचे तपासात पुढे आले आहे. यामुळे जाधव कोकणात नोकरी करत असल्यापासूनच लातूरमध्ये प्रथम सीईटी व नंतर नीट सेंटर, क्लास चालवीत असल्याचे समोर आले आहे. जाधव यांचे नाव नीट परीक्षा घोटाळ्यात समोर आल्यानंतर एकच आणि त्याबाबतची संपूर्ण तपासणी पथकाकडून करून व लातूर पोलिसांच्या आलेल्या अहवालावरून त्याला जिल्हा परिषदेकडून निलंबित करण्यात आले.
नीट परीक्षेत विद्यार्थ्यांना गुणवाढवून देण्याच्या आमिषाबरोबरच त्याच्या मोबाइल गॅलरीमध्ये तपासा दरम्यान पोलिसांना अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यात नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण वाढवायचे आमिष देऊन ५० हजार अॅडव्हान्सपोटी स्वीकारून त्यांना पुढे गुजरात, कर्नाटक, बिहार यासारख्या बाहेरच्या राज्यातील सेंटरवर परीक्षा देण्यासाठी पाठवण्यात यायचे. त्यानंतरच त्यांच्यात बोलणी झालेली रक्कम स्वीकारली जायची. याबाबत अनेक ठिकाणी सब एजंट नेमल्याचेही समोर आले असून त्यात अनेकांचा समावेश असून त्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे या प्रकणाचा तपास आता सीबीआयकडे वर्गझाला आहे. यामुळे त्याच्या संपर्कातील सिंधुदुर्ग, सोलापूर, लातूर, धाराशिव जिल्ह्यातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.