नई दिल्ली : नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने भ्रष्टाचार प्रकरणी बुधवारी डीजीसीएच्या संचालकाला निलंबित केले आहे. मंत्रालयाने एक निवेदन जरी करून ही माहिती दिली आहे.“गैरव्यवहारांबाबत शून्य सहनशीलता आहे. अशा कोणत्याही समस्येस कायद्यानुसार कठोर उपायांनी नेहमीच हाताळले जाईल, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे. डीजीसीएचे संचालक कॅप्टन अनिल गिल यांना निलंबित करण्याआधी मंत्रालयाने त्यांच्याविरुद्ध सुरु असलेली लाचखोरीचे कराराने केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडे हस्तांतरित केले होते.
मंत्रालय आणि डीजीसीए यांना गिल यांच्यावर आरोप करणारे एक निनावी ईमेल प्राप्त झाले होते. गेल्या महिन्यात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर (डीजीसीए) भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. एका वरिष्ठ संचालक-स्तरीय अधिकाऱ्यावर तिसऱ्यांदा आपल्या अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी अनेक प्रश उपस्थित करण्यात येत होते. आता या प्रकरणी मंत्रालयाने कठोर भूमिका घेतली आहे.