21.6 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeलातूर‘व्हीजीएमसी’मधील बा  रुग्ण विभाग, वसतिगृहाची कामे त्वरित पूर्ण करावीत

‘व्हीजीएमसी’मधील बा  रुग्ण विभाग, वसतिगृहाची कामे त्वरित पूर्ण करावीत

लातूर : प्रतिनिधी
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अद्ययावत बा रुग्न विभाग, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र विभाग इमारती तसेच विद्यार्थी, विद्यार्थिनी वसतीगृहाची उर्वरीत कामे त्वरीत पूर्ण करुन सर्वसामान्य रुग्ण व विद्यार्थ्यांची गैरसोय टाळावी, अशी मागणी गुरुवारी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री  आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत केली आहे.
विधानसभेत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांच्या स्थितीबाबत  चर्चा सुरु असतांना लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरु असलेल्या बांधकामांना निधी देऊन ती कामे गतीने पूर्ण करण्याची मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आमदार अमित  देशमुख वैद्यकीय शिक्षणमंत्री असतांना जवळपास ७५ कोटी रुपये खर्चाच्या अद्यावत बा रुग्ण विभाग उभारणीस मंजुरी देण्यात आली आहे. हे काम तांत्रीक कारणावरुन रेगाळले आह. ते त्वरीत पूर्ण करावे. याच कालावधीत लातूर शहराच्या गावभागात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने स्त्रीरोग, प्रसुतीशास्त्र विभाग व रुग्णालयासाठी जवळपास १०० कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. हे रुग्णालय जलदगतीने पूर्ण करावे. महाविद्यालय परीसरात विद्यार्थ्यांची वसतीगृहे बांधून तयार आहेत. तेथील फर्नीचर व उर्वरीत किरकोळ कामे पूर्ण करावीत आदी मागण्याही त्यांनी यावेळी केल्या. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी याकामी लक्ष घालावे, अशी विनंती आमदार देशमुख यांनी याप्रसंगी केले.
सभागृहात प्राथमिक चर्चा झाल्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी विद्यमान वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध व्यवस्था उभारणी संदर्भात मागणीचे निवेदन सादर केले.  महाविदयालय परीसरात जुन्या जीर्ण इमारतीच्या जागेवर ४०० खाटाची नवीन इमारत उभारावी, विद्यार्थी व विद्यार्थीनीच्या वसतीगृहात चौथ्या मजल्याचे बांधकाम, टाइप तीन व चार निवासस्थानाचे बांधकाम, ड्रेनेज व्यवस्था तसेच ५ हजार लीटर क्षमतेचा जलकुंभ उभारणीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR