21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeसोलापूरमागण्या मान्य न झाल्यास एकादशी दिवशी शेळ्या मेंढ्या सहित विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालणार

मागण्या मान्य न झाल्यास एकादशी दिवशी शेळ्या मेंढ्या सहित विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा घालणार

पंढरपूर : धनगर समाज व एन्टी प्रवर्गातील सर्व तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर बिनव्याजी कर्ज मिळावे यांची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी तशा प्रकारचे आदेश सर्व बँकांना द्यावेत पंढरपूर येथे अहिल्या भवन साठी जागा उपलब्ध करून पाच कोटी निधी द्यावा या प्रमुख मागण्यासाठी विधानभवनातील उपमुख्यमंत्री यांचे कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले यावेळी माऊली हळणवर, नवनाथ पडळकर अमोल कारंडे यतीराज होनमाने यांच्यासह धनगर समाजाचे शिष्टमंडळ उपस्थित होते. वरील मागण्या मान्य न झाल्यास पंढरपूर येथे आषाढी एकादशीला पहाटे दोन वाजता विठ्ठल मंदिराला शेळ्या मेंढ्या सहित धनगर समाज बांधव प्रदक्षणा घालणार आहेत होणाऱ्या सर्व परिणामाची जबाबदारी सरकार वरती राहील अशा प्रकारचे निवेदन दिले.

यावेळी बोलताना भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर म्हणाले की हे सरकार धनगर समाजाला दुजाभावाची वागणूक देत असल्याचे दिसून येते . धनगर समाजातील तरुण सरकारवर प्रचंड नाराज असून सरकार धनगर समाजाला मदत करत नसल्याची भावना समाजात निर्माण झाली आहे त्यामुळे आषाढी एकादशीला होणाऱ्या आंदोलनात आम्ही जरी भाजपाचे कार्यकर्ते असलो तरी समाजाची भावना लक्षात घेऊन आम्हाला या आंदोलनात सरकार विरोधात उतरावे लागेल.

धनगर समाजातील तरुणांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे .इतर समाजातील तरुणांना अनेक उद्योग करण्यासाठी चार दिवसात कर्ज मंजूर केले जाते त्याचे व्याज सरकार भरते परंतु धनगर समाजाला अहिल्यादेवी आर्थिक विकास महामंडळाकडून फक्त शेळ्या मेंढ्या ची एक दोन प्रकरणे दिली जातात त्यामुळे समाजातील तरुणांमध्ये बेरोजगारांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे .सरकारने या मागण्याची गंभीर दखल घ्यावी अशा प्रकारचे निवेदन उपमुख्यमंत्री यांना दिले. त्यांनीही सकारात्मक भूमिका घेत लवकरच यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR