29 C
Latur
Saturday, October 5, 2024
Homeलातूरनीट परीक्षेत गैरव्यवहार, आरोपी जलील पठाणला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नीट परीक्षेत गैरव्यवहार, आरोपी जलील पठाणला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

लातूर: नीट परीक्षेमध्ये लातूरच्या दहा विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपीला कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयन कोठडी सुनावली आहे.

बिहारच्या पाटण्यात उघड झालेल्या नीट परीक्षेच्या घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रात सापडत आहेत. मराठवाड्याच्या लातूरला विद्येची नगरी म्हटलं जातं, तिथं सीबीआयची टीम तपास करत आहे. तब्बल १० विद्यार्थ्यांचे गुण वाढवून दिल्याचं प्रकरण पुढे आलेलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी जलील पठाण याला अखेर शनिवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मुख्य आरोपी गंगाधर सीबीआयच्या अटकेत असून त्याने दिल्ली नव्हे तर आंध्र प्रदेशमध्ये काम करत असल्याची माहिती दिली आहे. सध्या बंगळूरु येथे सीबीआय गंगाधरची चौकशी करत आहे.

नीट परीक्षा प्रकरणातला दुसरा आरोपी संजय जाधव याला आणखीन दोन दिवसाची सीबीआय कोठडी मिळाली आहे. २ जुलै रोजी नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण या दोघांना सीबीआयच्या तपासासाठी कोठडी सुनावली होती. दरम्यान, या दोन्ही आरोपींना शनिवारी लातूरच्या न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले होते. यात आरोपी जलील पठाणला न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर संजय जाधवला आणखीन दोन दिवसाची सीबीआय कोठडी सुनावली आहे. दरम्यान, नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी गंगाधर हा दिल्ली येथे नाही तर आंध्र प्रदेशमध्ये काम करत असल्याची माहिती देखील समोर आली आहे. गंगाधर हा बंगळूरु सीबीआयच्या अटकेत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR