27.3 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeराष्ट्रीयशरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाची मान्यता

शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाची मान्यता

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मागणीला मान्यता दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला लोकसभा निवडणुकीत वापरलेले तुतारी चिन्ह आगामी विधानसभा निवडणुकीसही वापरण्यास मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही शरद पवार गटाचे आता तेच चिन्हं असणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच शरद पवार यांच्या पक्षाला आता देणगी स्वीकारता येणार आहे.निवडणूक आयोगाने तशी अधिकृत मान्यताच आज पक्षाला दिली आहे. त्यामुळे शरद पवार गटाला खूप मोठा दिलासा मिळाला आहे.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आता कलम २९ ब नुसार देणगी स्वीकारता येणार आहे. यापुढे शरद पवार यांच्या पक्षाला देणगी स्वीकारण्यासाठी अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. निवडणूक आयोगासमोर आज याबाबत सुनावणी पार पडली. या सुनावणीत शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्षाला देणगी स्वीकारण्यास मान्यता मिळाली आहे. शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा आहे.

निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. आज आमच्या चार वेगवेगळ्या महत्त्वाच्या सुनावण्या दिल्लीत होत्या. शरद पवार यांचा पक्ष ज्याप्रकारे काढून घेण्यात आला, पण जनतेने आम्हाला आशीर्वाद दिले त्याबद्दल आभार. आम्हाला तुतारी हे चिन्ह तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले होते. पण आम्हाला चेक घेण्याचा अधिकार नव्हता. तसेच टॅक्स बॅनेफिट मिळत नव्हता. तर आता आमची विनंती मान्य करण्यात आली आहे अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. दुसरी एक मागणी चिन्हातील कन्फ्युजनबद्दल होती. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह जिथे असेल तिथे दुसरे तुतारी हे चिन्ह नको आणि असा अन्याय इतर कोणत्याही पक्षावर होऊ नये ही विनंती केली आहे. आयोग म्हणाले त्यावर आम्ही अभ्यास करू अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR