25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयविराट कोहलीच्या पबवर बंगळुरू पोलिसांची कारवाई

विराट कोहलीच्या पबवर बंगळुरू पोलिसांची कारवाई

बंगळूरू : क्रिकेटपटू विराट कोहलीच्या बंगळूरू येथील पबवर पोलिसांनी कारवाई केली आहे. बंगळुरू पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत पब उघडणा-यांवर कारवाई केली होती. अनेक पबच्या व्यवस्थापनाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. क्रिकेटपटू विराट कोहलीच्या मालकीचे एक पबही आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूमधील एमजी रोडवर एक वन ८ कम्यून पब आहे. हा पब विराट कोहलीच्या मालकीचा आहे. बंगळुरू पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वन ८ पबसह इतर पबविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. कामकाजाची वेळ संपूनही रात्री उशिरापर्यंत पब सुरू असल्याचा आरोप आहे.

डीसीपी सेंट्रलने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्ही पहाटे दीड वाजेपर्यंत चालण्यासाठी सुमारे ३-४ पबवर कारवाई केली. रात्री मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याच्या तक्रारीही आम्हाला मिळाल्या होत्या. पब मॅनेजरविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. पब फक्त पहाटे १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त काळ पब चालवता येत नाही. एमजी रोडवर स्थित वन ८ कम्युन पब चिन्नास्वामी स्टेडियम जवळ आहे. ६ जुलै रोजी, वन ८ कम्युन पबच्या व्यवस्थापकाविरुद्ध पब कामकाजाच्या वेळेच्या पलीकडे चालवल्याबद्दल एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR