21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeक्रीडाराहुल द्रविडने केले वाढीव बक्षीस परत

राहुल द्रविडने केले वाढीव बक्षीस परत

मुंबई : टी-२० क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघावर पैशांचा आणि बक्षिसांचा मोठा वर्षाव झाला. आयसीसीकडून २०.४ कोटी, तर बीसीसीआयकडून १२५ कोटी रुपये बक्षिसाची रक्कम देण्यात आली. बीसीसीआयने जाहीर केलेल्या १२५ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेपैकी १५ खेळाडूंना प्रत्येकी ५ कोटी रुपये मिळतील.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही एकूण बक्षीस रकमेपैकी ५ कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जाणार आहेत. उर्वरित प्रशिक्षकमधील सदस्यांना प्रत्येकी २.५ कोटी रुपये देण्यात येणार आहे. मात्र राहुल द्रविडने अतिरिक्त पैसे घेण्यास नकार दिला आहे. मला ५ कोटी रुपये नको, इतर प्रशिक्षकांप्रमाणे मला देखील २.५ कोटी रुपये देण्यात यावे, असे राहुल द्रविड यांनी सांगितले आहे. राहुल द्रविडच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी राहुल द्रविडला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे अशी मागणी केली आहे. राहुल द्रविडला भारतरत्न पुरस्काराने केंद्र सरकारने सन्मानित करणे योग्य राहील, तो त्याचा दावेदार देखील आहे, असं सुनील गावसकर यांनी म्हटले. राहुल द्रविड महान खेळाडू आणि कॅप्टन राहिला आहे. जेव्हा राहुल खेळत होता त्यावेळी वेस्ट इंडिज विरुद्ध मालिका जिंकणे अवघड होते. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांच्या विरोधात मालिका जिंकणारा राहुल द्रविड तिसरा कॅप्टन ठरला आहे. नॅशनल क्रिकेट अकादमीत नव्या खेळाडूंना उभे करण्यात त्याचे योगदान महत्त्वाचे आहे असे सुनील गावसकर म्हणाले.

द्रविडचे भारतीय क्रिकेटमध्ये योगदान
राहुल द्रविड यांनी भारतासाठी १६४ कसोटी मॅचेसमध्ये १३,२८८ धावा केल्या. तर, ३४४ वनडे मॅचेसमध्ये १०,८८९ धावा केल्या आहेत. राहुलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २४ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये राहुलच्या नावावर ४८ शतके आणि १४६ अर्धशतके आहेत. २००३ च्या दरम्यान भारतीय संघात तज्ज्ञ विकेटकीपर नव्हता त्यावेळी राहुल द्रविडने विकेटकीपर म्हणून देखील जबाबदारी पार पाडली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR