उत्तर गाझा : इस्रायली सैन्याने गाझामधील एका शाळेवर एअर स्ट्राईक केला आहे. यामध्ये २९ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. एजन्सी एएफपीनुसार, एका आठवड्यातील हा दुसरा हल्ला आहे, ज्यामध्ये शाळेला लक्ष्य करण्यात आले आहे. ज्या शाळेत हा हल्ला झाला तेथे निर्वासितांना ठेवण्यात आले होते.
गेल्या चार दिवसांपासून निर्वासितांना ठेवण्यात आलेल्या अशा ठिकाणांवर इस्रायल हल्ले करत आहे. इस्रायल शाळा आणि रुग्णालयांवरही हल्ले करत आहे. याआधी शनिवारी इस्रायली लष्कराने गाझामध्ये हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू आणि ७५ हून अधिक लोक जखमी झाले होते. ही शाळा संयुक्त राष्ट्रांची होती, जिथे निर्वासितांना ठेवण्यात आले होते.
संयुक्त राष्ट्राने याला धोकादायक पाऊल म्हटले आहे. खान युनिसमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी आणखी वेळ द्यावा असेही म्हटले आहे. या काळात इस्रायलने निर्वासितांवर हल्ले करू नयेत. इस्रायली लष्कराने पॅलेस्टिनींना खान युनिस रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर तेथील तीन मोठी रुग्णालये बंद करण्यात आली आहेत.