24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरआम्ही आपल्या सोबत, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी धनगर समाजाच्या उपोषण स्थळी दिली भेट

आम्ही आपल्या सोबत, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी धनगर समाजाच्या उपोषण स्थळी दिली भेट

लातूर : प्रतिनिधी
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण द्यावे, या मागणीकडे  राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लातूर शहरातील पु. अहिल्यादेवी होळकर चौकात गेल्या १३ दिवसापांसून बेमुदत उपोषणास बसलेले अनिल गोयकर व चंद्रकांत हजारे यांची दि. १० जुलै रोजी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली. त्यांनी उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची अस्थेवाईकपने चौकशी केली.  धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही आपल्या समाजासोबत असल्याचे त्यांनी  यावेळी  सांगीतले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण द्यावे,  या मागणीसाठी अनिल गोयकर, चंद्रकांत हजारे दि. २८ जुलपासुन पु. अहिल्यादेवी होळकर चौकात बेमुदत उपोषण करीत आहे. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी बुधवारी उपोषणस्थी जाऊन गोयकर व हजारे यांची भेट घेतली. त्यांनी गोयकर, हजारे तसेच धनगर समाज बांधव यांच्याशी आरक्षण संदर्भात चर्चा केली. सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी माजी आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे, राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, माजी महापौर अ‍ॅड. दीपक सुळ, लातूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुभाष घोडके, प्राचार्य एकनाथ पाटील, संभाजी सुळ, अ‍ॅड. येचाळे, विष्णू धायगुडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, सचिन दाताळ यांच्यासह मान्यवर समाज बांधव उपस्थित होते.
आमदार धिरज देशमुख यांचे धनगर समाजाकडून आभार
विधी मंडळाच्या अधिवेशनात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी सरकारकडे लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी  लक्षवेधी मांडली. सभागृहात सरकारचे लक्ष वेधले त्याबद्दल धनगर समाजाकडून तसेच उपोषणकर्ते अनिल गोयकर, चंद्रकांत हजारे यांनी आमदार धीरज देशमुख यांचे आभार व्यक्त केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR