28.5 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयनीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड राकेश रंजनला अटक

नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाइंड राकेश रंजनला अटक

पाटणा : बिहारमधील नीट- यूजी परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुख्य आरोपी राकेश रंजन (रॉकी) याला आज अटक केली. राजधानी पाटण्यातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

आज रॉकीला पाटना येथील स्थानिक न्यायालयामध्ये हजर करण्यात आले असता त्याला दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. रॉकीशी संबंधित पाटणा आणि कोलकात्यामधील काही ठिकाणांवरही छापे घालण्यात आले असता तपास संस्थेच्या हाती आक्षेपार्ह साहित्य लागले. रांचीमध्ये रॉकीच्या मालकीचे एक हॉटेल देखील आहे. नीटचा पेपर फुटल्यानंतर त्यानेच उत्तरपत्रिकेचा जुगाड केला होता अशी माहिती समोर आली आहे. धनबादमधून अमनसिंह याला अटक केल्यानंतर रॉकी तपास यंत्रणेच्या हाती लागला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR