सोलापूर :शहरातील जुना पुना नाका येथील पुणे नाका स्मशानभूमी शेजारी असलेल्या गटारीच्या चेंबरमध्ये एक महिलेचा मृ तदेहआढळून आला. घटनास्थळी तातडीने फौजदार चावडी पोलिसांनी धाव घेत मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रूग्णालयात दाखल केला आहे. पोस्टमार्टम नंतर मृत्यूचे कारण उघड होणार आहे.
मंगल ऊर्फ पिंकी पिंटू कांबळे (वय ३३) असे मृत महिलेचे नाव आहे. पुणे नाका येथील स्मशानभूमी शेजारी असेलेल्या झोपडट्टीमध्ये ती राहत होती. मृत महिला मंगल ही अनेक दिवसांपासून आजारी होती. त्याशिवाय दोन दिवस झाले ही महिला गायब होती. दोन दिवसानंतर या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. मात्र, चेंबरमध्ये मृतदेह असल्याचे एक ही प्रत्यक्षदर्शी नाही त्यामुळे मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.पोस्टमार्टमचा रिपोट आल्यानंतर मृत्यूचे कारण उघड होणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीमुळे ही घटना घडल्याने मदतची मागणीदेखील नातेवाईकांनी केली आहे.
फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे पोलिस शिपाई बी.जे. कसबे यांनी कांबळे यांचा मृतदेह तपासणीसाठी शासकीय रूग्णालयात दाखल केला. शासकीय रूग्णालयातील डॉ. श्रीकृष्ण बागल उपचारापूर्वी मयत झाल्याचे घोषित केले. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीमध्ये झाली. झोपडीशेजारी पाणी जाण्यासाठी गटार आहे. या गटारीचे तोंड उघडे असल्याने त्यात पडून महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा मयत मंगलच्या आईने केला आहे.