21.2 C
Latur
Thursday, January 16, 2025
Homeमहाराष्ट्रविशाळगडावर तुंबळ ‘लढाई’?

विशाळगडावर तुंबळ ‘लढाई’?

विशाळगडावर स्थानिकांना मारहाण दगडफेक झाल्याचा आरोप; पोलिसांवर सुद्धा हल्ला केल्याचा आरोप

कोल्हापूर : किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण हटावसाठी आज खासदार संभाजी राजे छत्रपती विशाळगडाकडे शेकडो कार्यकर्त्यांसह रवाना झाले. मात्र, विशाळगडावर अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागले आहे.

विशाळगडावरील स्थानिकांवर हल्ला झाल्याचा प्रकार घडला आहे. इतकेच नव्हे तर बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांवर सुद्धा हल्ला झाल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागले आहे. दगडफेकीचे व्हीडीओ व्हायरल झाले आहेत.

गुन्हा दाखल झाल्यास अभिमान
संभाजी राजे छत्रपती यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. पोलिसांनी गडाकडे जाऊ नका, असे आवाहन केले आहे. संभाजीराजे यांनी विशाळगडाकडे कोणत्याही परिस्थितीत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे आज (१४ जुलै) सकाळी तुळजाभवानीचे दर्शन घेत विशाळगडाकडे प्रस्थान केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. दरम्यान, आयुष्यातील पहिला गुन्हा विशाळगडावर जात आहे म्हणून दाखल झाल्यास मला अभिमानच आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आम्ही विशाळगडावर पोहोचत आहोत. ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असला तरी आम्ही विशाळगडावर जाणारच, असे राजे यांनी म्हटले आहे. दुसरीकडे, स्वराज्य संघटनेचे उपाध्यक्ष अंकुश कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्याने संकटात मदत केली तोच विशाळगड संकटात आहे, आज विशाळगडाला अतिक्रमणमुक्त करणारच, असे म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR