मुंबई : ‘आयएमडीबी’ या चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी कंटेंटवरील जगातल्या सर्वात प्रसिद्ध आणि अधिकृत स्रोत्राने २०२३ च्या सर्वाधिक प्रसिद्ध भारतीय कलाकारांची घोषणा केली आहे. ‘आयएमडीबी’ ने या वर्षातील टॉप इंडियन स्टार्सची यादी जाहिर केली आहे.
या यादित बॉलिवूडसह टॉलिवूड कलाकारांचा देखील सामावेश करण्यात आला आहे. या यादीत प्रथम क्रमांक पटकावणारा अभिनेता ठरला आहे बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान. यादीनुसार किंग खान या वर्षातील टॉप भारतीय अभिनेता बनला आहे.
‘आयएमडीबी’ च्या २०२३ च्या टॉप १० सर्वाधिक लोकप्रिय भारतीय स्टार्सच्या यादीमध्ये अशा कलाकरांचा समावेश होतो, जे २०२३ च्या कालावधीत सतत ‘आयएमडीबी’ रँकिंगमध्ये सर्वोच्च रँकवर असतात.
१. शाहरुख खान
२. आलिया भट्ट
३. दीपिका पदुकोण
४. वामिका गब्बी
५. नयनतारा
६. तमन्ना भाटिया
७. करीना कपूर खान
८. शोभिता धुलिपाला
९. अक्षय कुमार
१०. विजय सेतुपती
शाहरुख खान त्याच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमुळे या यादित अव्वल स्थानी आहे. तर दुसरा क्रमांक आलिया भट्टने पटकावला आहे. या वर्षी तिचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि हॉलिवूडचा ‘हार्ट ऑफ स्टोन’ हे दोन सिनेमे रिलिज झाले होते.