21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeपरभणीशालेय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

शालेय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

परभणी : आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, परभणी तथा परभणी शहर महानगरपालिका परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय सुब्रतो फुटबॉल स्पर्धा डॉ. झाकेर हुसेन हायस्कुल येथील मैदानावर गुरुवार, दि.१८ जुलै रोजी पार पडल्या. उदघाटनीय सामना १७ वर्षा आतील मुले मॉडेल इंग्लिश स्कुल विरुध्द क्वी्न्स इंग्ल्शि स्कुल यांच्यात सामना झाला.

त्या मध्ये मॉडेल इंग्लिश स्कुल ४ गोलने विजय झाला तसेच १७ वर्षा आतील मुलीमध्ये न्यु.ज्योलतिर्गमय इंग्लिश स्कुल विरुध्द मॉडेल इंग्लिश हायस्कुल मध्ये झालेल्या सामन्यामध्ये १ गोलने मॉडेल इंग्लिश उर्दु हायस्कुलचा विजय झाला. क्रीडा आधिकारी सुयश नाटकर यांच्या हस्ते उद्दघाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष परभणी फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष मो. एकबाल, क्रिडा अधिकारी रोहन औढेकर, मनपा क्रीडा विभाग प्रमुख राजकुमार जाधव, डॉ.झाकेर हुसेन ज्युनीअर कॉलेजचे प्राचार्य खलील रहेमान, स.सिराज हुल्ल हक्का, रसीद हाजी स्फोजर्ट ऍकडमीचे उपाध्यक्ष बशिर, आथर चाऊस, प्रकाश रौंदळे, क्रीडा कोच प्रकाश पंडीत, मुजीब खान, अब्दु्ल हाकीम, अजमद खान, गंगाधर आव्हाड, श्रीकृष्ण शिंदे, आक्षय साळवे, आसलम शेख, स. सादेक, पांडुरंग दुधाटे, कैलास काकडे, आभिजित पुंड आदी उपस्थित होते. या स्पर्धेत एकुण ६ संघानी सहभाग घेतला आहे. दि.१९ जुलै रोजी पारीतोषीक वितरण होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR