24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeलातूरपंढरपूरहून परतणा-या वारक-यांची आरोग्य तपासणी

पंढरपूरहून परतणा-या वारक-यांची आरोग्य तपासणी

लातूर : प्रतिनिधी
आषाढी बारसनिमित्त लातूर जिल्ह्यातील हजारो वाकरकरी पंढरपूला जाऊन पांडूरंगाचे दर्शन घेऊन दि. १८ जुलै रोजी परतले. येथील मध्यवर्ती बसस्थानकावर उतरलेल्या वारक-यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आरोग्य तपासणी व अन्नछत्रात महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या सेवेचा हजारो वारका-यांनी लाभ घेतला.
आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र भक्तीमय वातावरण झाले होते. दि. १६ जुलै रोजी लातूर शहरासह जळकोट, उदगीर, अहमदपूर, शिरुर अनंतपाळ, चाकुर, देवणी, रेणापूर आदी तालुक्यांतून हजारो वारकरी, भाविक, भक्त पंढरपुरला विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला गेले होते. बुधवारी आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन पंढरपुरहून वारक-यांनी आपापल्या गावी परतीचा प्रवास सुरु केला. गुरुवारी येथील मध्यवर्ती बसस्थानकात वारक-यांची मोठी गर्दी झाली. या सर्व वारक-यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रक्त तपाणीसह आरोग्य तपासणी तसेच महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. सकाळी ९ वाजता सुरु झालेली ही वारक-यांची सेवा दुपारपर्यंत चालली. या सेवेचा हजारो वाकरक-यांनी लाभ घेतला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष रणवीर उमाटे यांच्या पुढकारातून वारक-यांची आरोग्य सेवा व अन्नछत्राच्या माध्यामातून महाप्रसादाची सेवा देण्यात आली. या सेवेत शहराध्यक्ष मनोज अभंगे, भागवत कांदे, बलभीम ठाकुर, संग्राम रोडगे, संतोष भोपळे, पवन करवदे,  तात्या मोहिते, परमेश्वर पवार, सरफराज शेख, जहांगीर शेख आदींनी सहभाग घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR