16.6 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeमहाराष्ट्रगट-ब, गट-कची पदे एमपीएससीतर्फे भरणार

गट-ब, गट-कची पदे एमपीएससीतर्फे भरणार

शासन निर्णय जारी, परीक्षार्थींना दिलासा

मुंबई : प्रतिनिधी
राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क (वाहन चालक वगळून) संवर्गातील सर्व पदे एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारने आज शासन निर्णय जारी केला. त्यामुळे नोकर भरतीसाठी परिश्रम घेणा-या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

या संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने एमपीएससीच्या कक्षेत आणण्यात येतील. यासाठी राज्य सरकारने पाच सदस्यीय समिती नेमली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतदेखील गट क प्रवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरली जातील, अशी घोषणा केली होती.

महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून गट-ब आणि गट-क प्रवर्गातील पदांची भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. नोकरभरतीची तयारी करणा-या विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल राज्य सरकारने घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती.

गट ब आणि गट क संवर्गातील पदे भरताना परीक्षांमध्ये अनेक वेळा गैरप्रकार आणि पेपरफुटीची प्रकरण समोर येत होती. यावेळी वारंवार या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाव्यात, अशा प्रकारची मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणा-या विद्यार्थ्यांकडून केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR