19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरशुक्रवारी २३२८ क्विंटल शेतमालाची आवक

शुक्रवारी २३२८ क्विंटल शेतमालाची आवक

लातूर : प्रतिनिधी
तब्बल १७ दिवसांनंतर लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत  दि. १८ जुलै रोजी सौदा निघाला होता. परंतु, अवघ्या २० मिनीटात बाजार समितीतील व्यवहार पुन्हा बंद झाले होते. शुक्रवार दि. १९ जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व प्रशासनाने खरेदीदार व आडत्यांमध्ये समन्वय  घडवुन आणल्याने सौदा निघाला आणि बाजार समिती सुुरु होताच २ हजार ३२८ क्विंटल शेतमालाची आवक झाली. यात सोयाबीनची सर्वाधिक १ हजार १४१ क्विंटल आवक होती.  खरेदीदाराने शेतमाल घेतल्यानंतर लागलीच पैसे अदा करावेत, अशी मागणी आडत्यांनी केली आहे. तर दुसरीकडे नियमाप्रमाणे १० दिवसांनंतरच आडत्यांना पैसे देण्याच्या निर्णयावर खरेदीदार ठाम असल्याने गेल्या १ जुलैपासून लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार ठप्प झाले  होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी व प्रशासाने हस्तक्षेप करीत तोडगा काढला. खरेदीदारांनी शेतमाल घेतल्यानंतर आडत्यांना २४ तासांत पैसे द्यायचे दि. १६ जूलै रोजी ठरले. दि. १७ जुलै रोजी आषाढी एकादशी व मोहर्रम असल्याने सुटीचा दिवस होता. त्यामुळे दि. १८ जुलै रोजी सौदा काढण्याचा निर्णय झाला. त्यानूसार गुरवारी सकाळी ११ वाजता सौदा निघाला. दोन-तीन आडतींवर सोयाबीनचा भाव ४४०० रुपये निघाला परंतू, खरेदीदारच फिरकले नसल्याने अवघ्या २० मिनीटात  आडत बाजारातील व्यवहार पुन्हा ठप्प झाले होते.  शुक्रवारी खरेदीदार व आडत्यांत समन्वय घडवून आणल्याने सौदा निघाला आणि सर्व व्यवहार सुरळीतपणे पुर्ववत सुरु झाले. त्यामुळे खरेदीदार, आडते, हमाल, मापाडी, गाडीवान यासह बाजार समितीशी संबंधीत सर्वच घटकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. शुक्रवारी आडत बाजारात सोयाबीनची ११४१ क्विंटल आवक होती. त्याला प्रति क्विंटल ४४०० रुपये भाव मिळाला.
गुळाची आवक ११३ क्विंटल आवक झाली. भाव ३७६० रुपये, गहू ७० क्विंटल भाव २६००, ज्वारी हायब्रीड २४ क्विंटल, भाव २३००, ज्वारी रब्बी १९३ क्विंटल, भाव २६५०, ज्वारी पिवळी ४४ क्विंटल, भाव ४०००, हरभरा ६१४ क्विंटल, भाव ६४००, तूर ८७ क्विंटल, भाव १०६००, करडई ७ क्विंटल, भाव ४२००, चिंचोका १६ क्विंटल, भाव २६००, कडबा १९ क्विंटल तर भाव ३००० रुपये होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR