22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यसतत औषधे घेण्याच्या सवयीमुळेही वाढतो लठ्ठपणा!

सतत औषधे घेण्याच्या सवयीमुळेही वाढतो लठ्ठपणा!

संशोधन । गर्भनिरोधक गोळ्या, मल्टी-व्हिटॅमिन, इन्सुलिन आणि डायबेटिस, उच्च रक्तदाबाच्या औषधांचा दुष्परिणाम ठरतो कारणीभूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आजकाल लठ्ठपणा ही एक गंभीर समस्या बनत चालली आहे. खराब जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी हे त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे. नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, जर एखादी व्यक्ती सतत औषध घेत असेल तर त्या व्यक्तीचं वजन नक्कीच वाढू शकतं.

काही वेळा उपचारादरम्यान वापरल्या जाणा-या औषधांमुळेही वजन वाढते. प्रत्येक औषधाचा काही ना काही दुष्परिणाम असतोच. अशाच काही औषधांबाबत जाणून घेऊया…

गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानेही महिलांचं वजन वाढू लागतं. या औषधांमध्ये असलेलं प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन हार्मोन्सचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतात. त्यामुळे शरीरात फ्लूइड रिटेन्शन होण्यास सुरुवात होते. त्यामुळे वजन वाढू लागते.

मल्टी-व्हिटॅमिन औषध दीर्घकाळ घेतल्याने देखील वजन झपाट्याने वाढते. यामुळे लठ्ठपणाची समस्या उद्भवू शकते. अशी औषधे शरीरात मेटाबॉलिज्म प्रोसेस एक्टिव्ह करतात. त्यामुळे लोकांना भूक लागते आणि त्यांचे वजन झपाट्याने वाढू लागते.

हाय बीपीचे रुग्णही रोज औषधे घेत असतील, तर भविष्यात हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी औषधासोबतच व्यायाम करणे देखील अत्यंत गरजेचे आहे.

मधुमेही रुग्णांचे मधुमेहावरील औषधे आणि इन्सुलिनच्या वापरामुळेही वजन वाढते. त्यामुळे मधुमेही रुग्णाने आपल्या आहार आणि व्यायामाची विशेष काळजी घेणे हिताचे ठरते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR