22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूर१ कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण

१ कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण

लातूर : प्रतिनिधी
रेणापूर तालुक्यातील दर्जी बोरगाव आणि गरसुळी येथे आमदार निधिसह विविध योजनांमधून मंजूर असलेल्या सुमारे एक कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोर्कापण व भूमिपूजन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते शनिवारी झाले.

यावेळी गव्हाण व ब्रह्मवाडी ग्रामस्थांचीही आमदार धिरज विलासरावजी देशमुख यांनी भेट घेतली. विविध विकास कामांचा संदर्भात ग्रामस्थांची चर्चा केली. गरसुळी येथे स्थानिक आमदार विकास निधीतून बांधलेला गावांतर्गत सिमेंट रस्ता (१० लक्ष), मुलभूत सुविधेंतर्गत स्मशानभूमी सिमेंट रस्ता (१० लक्ष), मनरेगा अंतर्गत सिमेंट रस्ता (१० लक्ष) या कामांचे लोकार्पण केले. तसेच, दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत साठे वस्ती सिमेंट रस्ता (७ लक्ष) व सिमेंट नाली करणे (५ लक्ष), तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत गरसुळी तांडा येथे पेव्हर ब्लॉक रस्ता करणे (८ लक्ष), सिमेंट रस्ता करणे (५ लक्ष), सौर हायमास्ट बसविणे (५ लक्ष), सिमेंट रस्ता करणे (५ लक्ष) या कामांचे भूमिपूजन केले.

यावेळी माजी आमदार त्र्यंबक भिसे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, काँग्रेस रेणापूर तालुका अध्यक्ष जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जाधव, अनुप शेळके, काँग्रेस सेवादलाचे तालुकाध्यक्ष हनुमंत पवार, गटविकास अधिकारी सुमित जाधव, जिल्हा परिषदेच्या उप अभियंता उषा मोतीपवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता देवशेटवार, विस्तार अधिकारी गोविंद काळे, विश्वास देशमुख, प्रभाकर केंद्रे, बाजार समितीचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अ‍ॅड. शेषराव हाके, बालासाहेब कातळे, सतीश पाटील, संचालक प्रकाश सूर्यवंशी, प्रवीण माने, नागनाथ कराड, विश्वनाथ कागले, बाळकृष्ण माने, अशोक राठोड, वामन जाधव, संजय माने, सुंदरराव माने, अमोल माने, ग्रामसेवक राठोड, पंचायत समितीच्या कनिष्ठ अभियंता ए. व्ही. उडते, गरसुळी सरपंच अजय राठोड, उपसरपंच भास्कर चव्हाण, आनंद कातळे, काशीराम पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR