28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार, उद्धव ठाकरेंना टार्गेट केले तर सहानुभूती वाढणार

शरद पवार, उद्धव ठाकरेंना टार्गेट केले तर सहानुभूती वाढणार

खासदार विशाल पाटीलांचा दावा

सांगली : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत टीका केल्यानंतर महाविकास आघाडीला फायदा झाला होता. त्यामुळे येत्या काळात तुम्ही शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना जेवढे टार्गेट कराल तेवढी त्यांना मिळणारी सहानुभूती वाढणार असल्याचा दावा सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेल्या टीकेनंतर सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, पुण्यातील भाजपच्या अधिवेशनावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या टीकेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर त्यानंतर आता यावेळी सांगलीचे अपक्ष खासदारांनी मोठा दावा केला आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार भ्रष्ट्राचाराचे सरदार आहेत, तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष आहेत, अशी टीका केली होती.

महाराष्ट्राचे प्रमुख मुद्दे संसदेच्या अधिवेशनात मांडायचे आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मला बोलायचे होत, मात्र ती संधी मिळाली नव्हती. या अधिवेशनात राज्याचे मुद्दे मांडण्याची संधी मिळेल, ही अपेक्षा आहे. केंद्र सरकार शेतक-यांकडे पाहून अर्थसंकल्प मांडेल अशी अपेक्षा आहे. महागाई, बेरोजगारी हा देशापुढचा मुद्दा आहे त्यावर सरकारने मार्ग काढायला हवा अशी मागणी यावेळी पाटील यांनी केली.

पुण्यात बोलताना अमित शाह यांनी राजकारणाच्या पलिकडे जाऊन बोलले पाहिजे होते, पण ते काहीच बोलले नाहीत. ंिहदू मुस्लिम करून निवडणूक लढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो राज्यात चालला नाही. दीड लाखापर्यंत अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे, पण २० फुटाच्या पुढे पुराची पातळी गेली आहे. अधिवेशनात हा प्रश्न मी मांडणार असल्याचे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR