30.6 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रपंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी

पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी

कोल्हापुरात १५० गावे पुराच्या विळख्यात

कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपलं आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती आणखी गंभीर झाली आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत ३९.१ फूटाने वाढ झाल्याने नदीच्या आसपासची सुमारे दीडशे गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत.

कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. नदीकाठच्या बाधित गावांना सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

सोमवारी दुपारी १२ च्या सुमारात पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत ३९.१ फूटाने वाढ झाली. त्यामुळे नदीच्या आसपासची सुमारे १५० गावे पुराच्या विळख्यात सापडली आहेत.
सोमवार सकाळपासून जिल्ह्यात काही काळ पावसाचा जोर कमी झाला असला तरीही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती आणखी गंभीर होणार आहे.

८१ बंधारे पाण्याखाली
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे ८१ बंधारे पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे बाधित भागातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा आपत्ती विभाग सज्ज असल्याची माहिती जिल्हा आपत्ती विभागाचे प्रमुख प्रसाद संकपाळ यांनी दिली आहे.

१५० गावे पुराच्या विळख्या
पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील १५० गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील इतर नद्यांच्या पाण्याची पातळीही झपाट्याने वाढू लागली आहे. दरम्यान, कोल्हापूर शहरालगतच्या काही गावांनी जनावरांसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR