16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeलातूरइतरांच्या नावे मालमत्ता खरेदी?

इतरांच्या नावे मालमत्ता खरेदी?

तपास यंत्रणेनी न्यायालयापुढे वर्तवली शंका

विनोद उगीले
लातूर : बहुचर्चित लातूरातील नीट प्रकरणातील आरोपींनी नीट पेपर लिक प्रकरणातून मोठ्या प्रमाणात अर्थिक गैर व्यवहार केल्याचे समोर आले आहे. या अर्थिक गैरव्यवहारातून मिळविलेल्या पैशातून इतर आरोपींनी स्वत:च्या व इतरांच्या नावे स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणेला असून तशी शंका न्यालयापुढे संबधित अधिका-यांनी कागदोपत्री व्यक्त केली आहे.

तपास यंत्रणेला आरोपी संजय जाधव, जलील पठाण व एन. गंगाधरप्पा व फरार इरन्ना कोनगुलवार यांनी स्वत:च्या व इतरांच्या नावे स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी केल्याचा संशय असून तशी शंका न्यायालयापुढे संबधित अधिका-यांनी कागदोपत्री रिमांड यादीद्वारे व्यक्त केली आहे. तर तपासा दरम्यान आरोपीच्या व त्यांनी इतरांच्या नावे खरेदी केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा तपशिलही मिळवला असल्याची माहिती समोर येत आहे. यावरून लवकरच अर्थिक गैरव्यवहारातून संजय जाधव, जलील पठाण व एन. गंगाधरप्पा व फरार इरन्ना कोनगुलवार यांनी मिळवलेल्या व इतरांच्या नावे खरेदी केलेल्या मिळविलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेची चौकशी होण्याची शक्यता आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR