40 C
Latur
Tuesday, April 22, 2025
Homeपरभणीवाघाळा शिवारात आढळला बिबट्या

वाघाळा शिवारात आढळला बिबट्या

परभणी : पाथरी तालुक्यातील वाघाळा शिवारात रविवार, दि. २१ जुलै रोजी सायंकाळी ६च्या सुमारास बिबट्या दिसल्याने ग्रामस्थात भितिचे वातावरण पसरले आहे. या ठिकाणी वनपाल यांनी भेट देऊन ठश्यांची पाहणी करून सदरील ठसे बिबट्याचेच असल्याचे सांगितले. ग्रामस्थांनी किमान ८ दिवस सतर्क राहाण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरीकांनी एकट्याने शेतीत जाणे टाळावे असे देखील आवाहन करण्यात आले आहे.

पाथरी तालुक्यात वाघाळा शिवारात रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास शेख आब्बास शेख बाबामियाँ यांना शेतातून घरी येत असतांना ऊसाच्या शेताच्या बांधावर प्राणी उभा असल्याचे दिसले. त्यांनी निरखुन पाहिले असता तो वाघ असल्याचे त्यांच्या लक्षात अल्याने त्यांनी घाबरून इतरांना हाका मारल्या. या वेळी बिबट्या उसाच्या शेतात शिरल्याचे ते सांगतात. त्या नंतर ही माहिती ग्रामस्थांना कळताच गावात भितीचे वातावरण पसरले.

सद्य स्थितीत खरीपाच्या पिकांची मशागतीची कामे सुरू असून ग्रामस्थ लहान थोरांसह शेती कामात मग्न असून बिबट्या आला असल्याची माहिती मिळाल्याने सोमवारी बहुतांशी शिवार मानसा अभावी सुने सुने झाले होते. या विषयीची माहिती आणि पावलांचे ठसे सरपंच बंटी पाटील यांनी वनपाल विठ्ठल बुचाले यांना पाठवले. वनपाल सायंकाळी वाघाळा गावात आले आणि त्यांनी सरपंच बंटी पाटील, प्रत्यक्ष दर्शी शेख आणि ग्रामस्थांसह स्थळ पहाणी करून सबंधित पाऊल खुना या बिबट्याच्या असल्याचे सागून ग्रामस्थांनी पुढील किमान ८ दिवस सतर्क राहाण्याचे आवाहन केले. या साठी एकट्याने शेतात जाणे टाळावे.

घुंगरू बांधलेली काठी हातात ठेवावी, गळात रुमाल बांधावा, आखाड्यावर प्रकाश ठेवावा. एकट्याने झोपु नये, लाकूड पेटलेले ठेवावे असे काही उपाय सांगून बिबट्या आल्या मार्गाने परत जाईल. त्या मुळे किमान आठ दिवस सतर्कता राखावी असे आवाहन केले आहे. परंतू बिबट्या परीसरात दिसल्याच्या चर्चेने ग्रामस्थांमध्ये मात्र चांगलेच भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शेतक-यांना एकट्याने शेतात जाण्यासाठी भिती वाटत आहे. त्यामुळे शासनाने ताबडतोब बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR