नाशिक : प्रतिनिधी
नाशकात दिवंगत शोभा मगर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे अत्यंत अशोभनीय कृत्य आहे. शोभा मगर या शिंदे गटाच्या पदाधिकारी होत्या आणि १२ महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. मात्र तरी देखील पोलिसांनी त्यांचे नाव गुन्ह्यात टाकणे हास्यास्पद आहे, अशी प्रतिक्रिया संजय बडगुजर यांनी माध्यमांना दिली आहे.
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने काल नाशिक येथील घोटी टोल नाका येथे आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनानंतर पोलिसांनी काही जणांवर गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये शिवसेनेच्या एका दिवंगत महिला पदाधिका-याचे नाव असून त्या महिला पदाधिका-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘पोलिसांची जी कृती आहे ती अत्यंत चुकीची आहे.
दिवंगत शोभा मगर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे अत्यंत अशोभनीय कृत्य आहे. शोभा मगर या शिंदे गटाच्या पदाधिकारी होत्या आणि १०-१२ महिन्यांपूर्वीच त्यांचे निधन झाले आहे. मात्र तरी देखील पोलिसांनी त्यांचे नाव गुन्ह्यात टाकणे हास्यास्पद आहे’, असे सुधाकर बडगुजर म्हणाले.