16.2 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeमहाराष्ट्रठाण्याची सनम गेली पाकिस्तानला; गुन्हा दाखल

ठाण्याची सनम गेली पाकिस्तानला; गुन्हा दाखल

मुंबई : प्रतिनिधी
ठाण्यातील तरुणीने पाकिस्तानमधील तरुणाशी ऑनलाईन लग्न करत तिथे जाऊन राहिल्याचा प्रकार समोर आला. आता ती भारतात आल्यानंतर तिच्याविरोधात ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बनवल्याचा आरोप तिच्यावर आहे. नगमा नूर मकसूद अली ऊर्फ सनम खान असे तिचे नाव आहे. पासपोर्ट अधिनियम १९६७ च्या कलम १२ नुसार पासपोर्ट कायद्याचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला.

सनम खान हिच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. या व्यक्तीने सनम हिला मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. सनम हिने स्वत:चे आधार कार्ड, मुलीचे जन्म दाखले खोटे बनवल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणी सनम खान हिला पोलिसांनी चौकशीला बोलावले असून चौकशी सुरू आहे.

ठाण्यातील नगमा नूर मक्सूद अली हिचे उत्तर प्रदेशातील एका तरुणाशी लग्न झाले. त्या तरुणापासून तिला दोन मुली आहेत. २०१५ साली नगमाने तिचे नाव बदलून सनम खान केले. २०२२-२०२३ या वर्षात सनम खान हिची फेसबुकवर बशीर अहमद याच्याशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले. यामुळे नगमा आणि बशीर यांनी लग्न करायचे ठरवले.

पाकिस्तान आणि भारतातील संबंध चांगले नसल्याने तिला लग्नासाठी प्रत्यक्षात अडचणी येऊ लागल्या यामुळे यांनी ऑनलाईन लग्न केले. २४ फेब्रुवारी २०२४ या दिवशी सनम आणि बशीर यांनी ऑनलाईन लग्न केले. हाच आधार घेत सनमने पाकिस्तानात जाण्याकरता अर्ज केला. जून २०२४ या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सनम ठाण्याहून दिल्ली आणि दिल्लीहून अमृतसरला गेली. तिथून पाकिस्तान दूतावासाशी तिने संपर्क केला आणि तिथून वाघा बॉर्डर येथे जाऊन सनम पाकिस्तानात गेली.

वाघा बॉर्डर येथून सनम आपल्या दोन मुलींसह बसने एबोटाबाद येथे गेली. तिथे परत तिने लग्न आणि रिसेप्शन केले. यावेळेस फक्त बशीरचे कुटुंबिय सोबत होते. एबोटाबाद येथे काही महिने राहिल्यानंतर सनम पाकिस्तानातीलच रावळपिंडी येथे बशीरसह शिफ्ट झाली आणि तिथे ३ महिने राहिली. जुलै महिन्यात सनमला तिच्या भावाचा फोन आला की तिच्या आईची तब्येत ठीक नाही. सनमने पुन्हा पाकिस्तान दूतावासाशी संपर्क केला आणि भारतात जाण्यासाठी तिला परवानगी दिली असा दावा सनमने केला आहे.
एवढंच काय तर सनमने दोन्ही मुलींचे पाकिस्तानातून रिटर्न परमिट देखील बनवले. १७ जुलैला ती भारतात परत आली.

काही दिवस दिल्ली येथे राहिल्यानंतर सनम आपल्या भावासह २२ जुलैला म्हणजे २ दिवसांपूर्वीच ठाण्यात लोकमान्य नगर येथे आपल्या घरी आली. ही माहिती आयबी आणि ‘रॉ’ने ठाणे पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी काल तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी तिची चौकशी सुरू केली असून तिची सर्व कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR