18.2 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रपूजा खेडकरच्या आई-वडिलांच्या घटस्फोटात घोळ?

पूजा खेडकरच्या आई-वडिलांच्या घटस्फोटात घोळ?

पुणे : प्रतिनिधी
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. आता केंद्र सरकारने पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांच्या वैवाहिक स्थितीबद्दल रिपोर्ट मागवला आहे. एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी आपले आई-वडील वेगळे झाल्याचा दावा करत यूपीएससी परीक्षेत चुकीच्या पद्धतीने ओबीसी नॉन क्रिमीलेअरचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर केंद्राने हे निर्देश दिले आहेत.

पूजा खेडकर यांना मसुरी या ठिकाणी असलेल्या प्रशिक्षण केंद्रात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. पूजा खेडकर यांना मंगळवारपर्यंत चौकशीसाठी येण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या चौकशीआधीच पूजा खेडकर नॉट रिचेबल झाल्याचे समोर आले आहे. पूजा खेडकर यांच्याविरोधात यूपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच पूजा खेडकर यांना परीक्षा देण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच यूपीएससीने तुमची उमेदवारी रद्द का करू नये याबाबत कारणे दाखवा नोटीस देखील खेडकर यांना पाठवली आहे.

पूजा खेडकर यांचे प्रशिक्षण तीन जून २०२४ पासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू झाले होते. मात्र या काळात पूजा खेडकर यांनी त्यांच्या खासगी गाडीवर अंबर दिवा लावत महाराष्ट्र शासन असे लिहिले होते. याबाबत वाद झाल्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांची तात्काळ वाशिम येथे बदली झाली होती. वाशिममध्ये दोन वर्षांचा प्रशिक्षण कालावधी होता, नंतर त्याला देखील स्थगिती देण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR