26.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeक्रीडाभारताची अंतिम फेरीत धडक

भारताची अंतिम फेरीत धडक

कोलंबो : वृत्तसंस्था
वूमन्स टीम इंडियाने आशिया कप २०२४ स्पर्धेतील अंतिम फेरीत धडक मारली. टीम इंडियाने बांगलादेशवर १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशने भारताला विजयासाठी ८१ धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाच्या शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीनेच हे आव्हान ९ षटके राखून पूर्ण केले. टीम इंडियाने ११ षटकांत ८३ रन्स केल्या. पूर्ण केले. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग आणि एकूण चौथा विजय ठरला. आता श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील विजेता संघाविरुद्ध टीम इंडियाचा अंतिम फेरीत आशिया कप ट्रॉफीसाठी महामुकाबला होणार आहे.

शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने विस्फोटक फलंदाजी केली. स्मृतीने टीम इंडियासाठी सर्वाधिक धावांचे योगदान दिले. स्मृतीने १४१.०३ च्या स्ट्राईक रेटने ९ चौकार आणि १ षटकारासह ३९ चेंडूंमध्ये ५५ धावा केल्या तर शफाली वर्माने तिला चांगली साथ दिली. शफाली २८ चेंडूत ९२.८६ च्या स्ट्राईक रेटने २ फोरसह नॉट आऊट २६ धावा केल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR