26.4 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeपरभणीविधान परीषद सदस्यत्वाची राजेश विटेकर यांनी घेतली शपथ

विधान परीषद सदस्यत्वाची राजेश विटेकर यांनी घेतली शपथ

परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे नेते राजेश विटेकर यांनी आज रविवार, दि.२८ उपसभापती निलम गो-हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ घेतली. कर्तव्यनिष्ठ व प्रामाणिक कारभार करण्याविषयी संविधानिक मूल्यांना अनुसरून त्यांनी शपथ ग्रहण केली. विधान परिषदेच्या माध्यमातून विटेकर यांच्या रूपाने जिल्ह्याला युवा नेतृत्व असलेले आमदार मिळाले असून राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यात उत्साह पहायला मिळत आहे.

महाराष्ट्र विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा रविवारी विधान भवनातील विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित ११ आमदारांनी आज शपथ घेतली. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली. विधानसभेत ११ जागांसाठी १२ उमेदवार होते. यातील शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला. या निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित ११ आमदारांचा शपथविधी पार पडला. यावेळी पंकजा मुंडे (भाजप), योगेश टिळेकर (भाजप), अमित गोरखे (भाजप), परिणय फुके (भाजप), सदाभाऊ खोत (भाजप), भावना गवळी (शिंदे शिवसेना), कृपाल तुमाने (शिंदे शिवसेना), शिवाजी गर्जे (राष्ट्रवादी काँग्रेस), राजेश विटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रज्ञा सातव (काँग्रेस) आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली.

महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून परभणी जिल्ह्यातील राकाँचे नेते विटेकर यांनी शपथ घेतली. सरपंच ते आमदार हा प्रवास पूर्ण करीत असताना कुटुंबियांसह सर्वसामान्य लोकांनी पाठबळ दिले ते अतिशय महत्वपूर्ण आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून विकासात्मक काम करण्यासाठी कायम कटीबद्ध असेल, अशी भावना आ. विटेकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR