15.9 C
Latur
Wednesday, November 27, 2024
Homeधाराशिवतुळजापूरच्या तहसील, पालिका कार्यालयांना गळती

तुळजापूरच्या तहसील, पालिका कार्यालयांना गळती

तुळजापूर : प्रतिनिधी
येथील सर्वाधिक वर्दळीचे तहसील व नगर परिषद कार्यालयातील वरचे मजले ४०० मिलीमीटर झालेल्या पावसात गळू लागले आहेत. त्यामुळे तहसील कार्यालय बांधकामाच्या दर्जा बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तिर्थक्षेत्र तुळजापूर शहरात काही निजामकालीन शासकीय कार्यालय इमारती आजही वापरत आहेत. मात्र तहसील कार्यालयाची निजामकालीन इमारत पाडून नवीन बांधकाम केले आहे. सध्या पावसाळ्यात वरच्या मजल्यावर असणा-या तहसीलदार कायार्लायाच्या प्रवेशद्वारासमोरीत स्लॅब छत गळू लागला आहे. नगर परिषद कार्यालयातील वरच्या मजल्यावर असणा-या खोल्या गळत असून, स्लॅबचा खालचा प्लास्टर केलेला थर खाली पडल्याने आतील स्टील सळई स्पष्टपणे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर या दोन शासकीय कार्यालयात कामासाठी गेलेल्या नागरिक भितीच्या छायेत काम उरकुन घेत आहेत.

एकंदरीत या दोन सर्वाधिक वर्दळीच्या कार्यालयांच्या अशा अवस्थेमुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे या दोन कार्यालयामध्ये तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांची विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. असे असतानाही दोन्ही कार्यालयातील छतांच्या दुरूस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सदरील कार्यालयांची दुरुस्ती करुन छत मजबूत करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR