15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeक्रीडानेमबाजीत भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले; रमिता जिंदालचा अंतिम फेरीत पराभव

नेमबाजीत भारताचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले; रमिता जिंदालचा अंतिम फेरीत पराभव

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये नेमबाजीच्या अंमित फेरीत आज भारताची निराशा झाली. रमिता जिंदाल नेमबाजीत पदक जिंकू शकली नाही. महिलांच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात ती ७ व्या स्थानावर राहिली. फायनलच्या पहिल्या काही मालिकेत तिने चांगले गुण मिळवले मात्र, २० वर्षीय रमिता दडपणाखाली फसल्यामुळे अंतिम फेरीत तिने एकूण १४५.३ गुण मिळवले आणि स्पर्धेतून बाहेर पडली आणि भारताचे सुवर्ण
पदकाचे स्वप्न भंगले.

रमिताने अंतिम फेरीच्या पहिल्या मालिकेत एकूण ५२.५ धावा केल्या होत्या. त्यांचे गुण अनुक्रमे १०.३, १०.२, १०.६, १०.९ आणि १०.५ होते. दुस-या मालिकेत तिचा स्कोअर १०.४, १०.१, १०.७, १०.६ आणि ९.७ होता. यानंतर, तिस-या मालिकेत १०.४ आणि १०.५ होते. यानंतर तिचा प्रवास १०.२ आणि १०.२ गुणांसह संपला. या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक अनुक्रमे ोजिन बॅन, युटिंग हुआंग आणि गोग्निएट ऑड्रे यांनी पटकावले.

दरम्यान, ऑलिम्पिकच्या इतिहासात २० वर्षांनंतर रायफल नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी रमिता ही पहिली भारतीय महिला ठरली होतीे. २००४ मध्ये अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सुमा शिरूरने अंतिम फेरी गाठली होती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR