बीड : प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात दरोड्याची भयंकर घटना समोर आली आहे. हा दरोडा एवढा भयंकर होता की या घटनेमुळे संपूर्ण शहर हादरले आहे. आष्टीतील केरूळ गावातील भागवत वस्तीवर टाकण्यात आलेल्या या सशस्त्र दरोड्यात महिलांना जबर मारहाण करण्यात आली असून दरोडेखोरांनी दीड वर्षाच्या बाळालाही सोडले नाही.
महिलांच्या अंगावरील सर्व दागिने लंपास करत निर्दयी दरोडेखोरांनी आणखी चार जणांना बेदम मारले आहे. दरम्यान या घटनेने सध्या परिसरात मोठी दहशत पसरली असून पोलिस प्रशासनाचा मोठा फौजफाटा या ठिकाणी दाखल झाला असून घटनेचा तपास करत आहेत.
बीडच्या आष्टी तालुक्यातील केरूळ येथील भागवत वस्तीवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आला आहे. या घटनेमध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.