15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेस खासदारांनी मौन बाळगून दुर्घटनेतील मृतांना वाहिली श्रध्दांजली

काँग्रेस खासदारांनी मौन बाळगून दुर्घटनेतील मृतांना वाहिली श्रध्दांजली

नवी दिल्ली : केरळमधील वायनाड येथे झालेल्या भूस्खलनात १७४ लोकांचा मृत्यू आणि दिल्लीतील कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याबद्दल काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाचे सदस्य आणि खासदारांकडून संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आज एक मिनिट मौन बाळगून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील उपस्थित होते.

वायनाडच्या चुरलपाडा येथे मंगळवारी भूस्खलन झाले. ज्यामध्ये आतापर्यंत १७४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. चुरलमाला, वेल्लारीमाला, मुंडाकैल आणि पोथुकालू या भागात सर्वाधिक नुकसान झाले असून, नागरिकांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भीषण दुर्घटनेनंतर लष्कर, हवाई दल, नौदल, एनडीआरएफ, पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यात गुंतले आहेत.

भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने बचाव कार्याची माहिती दिली. लष्कराच्या दक्षिणी कमांडने सांगितले की, वायनाडमध्ये भूस्खलनानंतर भारतीय सैन्य एनडीआरएफ, राज्य बचाव दल, तटरक्षक दल, नौदल आणि हवाई दल या संकटाच्या काळात सतत काम करत आहेत. मानवनिर्मित पूल बांधून आतापर्यंत १००० लोकांना वाचवले आहे. तर लष्कराच्या तुकडीने सुमारे ७० मृतदेह बाहेर काढले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR