धाराशिव : प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर(नाव-गाव गोपनीय) तीच्याच गावातील एका नराधमाने सलग तीन महिने लैंगिक अत्याचार केला. तीला गोड बोलून व खाऊ खायला देऊन तीच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील एका गावातील एक अल्पवयीन मुलगी तीच्या घरी एकटी असल्याची संधी साधत तीच्याच गावातील एका नराधमाने तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार मागील तीन महिण्यांपासुन सुरू होता. ती मुलगी तीच्या राहत्या घरी एकटी असताना गावातील एका नराधमाने तिस गोड बोलून व खाऊ खायला देण्याचे अमिष दाखवून त्याच्या घरात नेवून तीच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेच्या वडीलांनी यांनी दि. ३१ जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि. सं. कलम-३७६(१), ३७६(२) (जे) (एम) (एन) सह बाल लैंगिक अत्याचार अधिनियम सन २०१२ कलम ८, ६, ८, १०, १२ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.